For any enquiry
दत्तराज नर्सरी ही फळोत्पादन संचालनालय, महाराष्ट्र यांच्या मान्यतेने १९९७ पासून परवानाधारक आहे. त्यामुळे आमच्याकडील प्रत्येक झाड हे विश्वासार्हतेचं प्रतीक आहे.
दत्तराज नर्सरीमध्ये १५० पेक्षा अधिक झाडांचे पर्याय उपलब्ध आहेत, त्यामध्ये:फळझाडे फुलझाडे मसाल्याची झाडे यांचा समावेश आहे.
आम्ही वापरतो ते उत्कृष्ट, उच्च उत्पन्न देणारे मातृवृक्ष, जे आमच्या रोपांची ताकद आणि उत्पादनक्षमता वाढवतात. यामुळे झाडं मजबूत, रोगप्रतिरोधक आणि दीर्घायुषी होतात.
हवामान व जमिनीनुसार योग्य झाडाची निवड, लागवडीची पद्धत, खत व पाण्याचे व्यवस्थापन, झाडांची निगा आणि रोगनियंत्रण याबाबत संपूर्ण माहिती.
दत्तराज नर्सरी आठवड्याचे सातही दिवस ग्राहकांसाठी खुली आहे.
कोणत्याही दिवशी भेट द्या – मार्गदर्शनासह झाडांची खरेदी करा.
इथे तुम्ही खरेदी करू शकता दुर्गा भूसुधारक एक उत्कृष्ट सेंद्रिय भू-सुधारक, जो तुमच्या झाडांची मुळे मजबूत करतो, वाढ जलद करतो आणि उत्पादनात वाढ करतो.
तुम्ही रोपांचे होलसेल व्यापारी, शेतकरी किंवा लँडस्केपिंग प्रोजेक्टसाठी झाडं घेणार असाल, तर आमची विशेष ट्रान्सपोर्ट सेवा तुमच्यासाठीच आहे!
दत्तराज नर्सरी तुमच्या मोठ्या ऑर्डरसाठी देते व्यावसायिक आणि विश्वासार्ह ट्रान्सपोर्ट सुविधा:
✅ 100, 500 किंवा 1000+ झाडांसाठीही वाहन उपलब्ध
✅ पिकअप, ट्रक, टेम्पो – झाडांच्या संख्येनुसार वाहनांची सोय
✅ वेळेवर डिलिव्हरीची खात्री – शेतावर, दुकानावर किंवा प्रोजेक्ट साईटवर
✅ महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक 800 km पर्यंत कोणत्याही जिल्ह्यात सेवा उपलब्ध
होलसेल झाडांची खरेदी केली आणि ट्रान्सपोर्ट तयार आहे? मग लोडिंगची जबाबदारी आमच्यावर सोडा!
दत्तराज नर्सरी मध्ये तुम्हाला मिळते:
✅ एक्स्पर्ट प्लांट लोडिंग टीम
✅ प्रत्येक झाडाचं काळजीपूर्वक लोडिंग
✅ सर्व प्रकारच्या झाडांची काळजीपूर्वक हाताळणी
✅ मोठ्या ऑर्डरसाठी जलद आणि सुरक्षित लोडिंग
✅ ट्रक, टेम्पो, पिकअप – कोणत्याही वाहनासाठी सुसंगत लोडिंग सेवा
फक्त झाडं विकणं हे आमचं उद्दिष्ट नाही, तर तुमच्या झाडांची योग्य वाढ होईपर्यंत सोबत राहणं हेच आमचं वचन आहे!
दत्तराज नर्सरी मध्ये तुम्हाला झाडं घेतल्यानंतर मिळतं:
✅ हवामान व जमिनीप्रमाणे झाडांची निगा कशी घ्यावी याचे मार्गदर्शन
✅ खत, पाणी, रोग-कीड नियंत्रण यासंबंधी सविस्तर माहिती
✅ फोन, व्हॉट्सअॅप किंवा भेटीद्वारे सतत संपर्कात राहण्याची सुविधा
✅ नवीन शेतकऱ्यांसाठी सुलभ आणि समजण्यासारखी सल्ला सेवा
✅ प्रत्येक झाडाच्या वय व अवस्थेनुसार सल्ला
तुमचं यश म्हणजे आमचा आनंद – झाडं वाढवण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत!
नर्सरी मध्ये सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजे पर्यंत विक्री चालू असते.
आठवड्याचे सातही दिवस नर्सरी संध्याकाळी ६ वाजे पर्यंत चालू असते.
हो, ५०% ऍडव्हान्स पेमेंट करून तुम्ही झाडांची बूकिंग करू शकता.
तुम्ही नर्सरी ला भेट न देता फक्त फोनवर झाडे मागवू शकता. झाडे मागवण्यासाठी आपले संपूर्ण नाव, पत्ता, फोन नंबर आणि तुम्हाला हव्याअसलेल्या झाडांची यादी फोन वर किवा व्हॉट्सॲप वर पाठवा. पाठवलेल्या झाडांचे बिल आणि पेमेंट झाल्या नंतर योग्य ट्रान्सपोर्ट ठरून तुम्हाला तुमची झाडे तुमच्या पत्त्या वर पाठवण्यात येतील.
तुमच्या फळबागेच्या स्वप्नपूर्तीसाठी आजच संपर्क करा!